वैद्यकीय आरोग्य शिबिरांतर्गत कामगारांनी केली तपासणी

 Abhyudaya Nagar
वैद्यकीय आरोग्य शिबिरांतर्गत कामगारांनी केली तपासणी

काळाचौकी - काळाचौकी अभ्युदयनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय नायगांव अंतर्गत शासकीय गतिमान अभियाना निमित्त कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता वैद्यकीय आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर गवई यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन केलं होतं.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांवर होणारा परिणाम याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्यात आलं असून मधुमेह, उच्च रक्तदाब यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शिबिरात 163 कामगारांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली.

Loading Comments