Advertisement

अखेर धनश्रीला मिळाले हृदय


अखेर धनश्रीला मिळाले हृदय
SHARES
Advertisement

जालना जिल्ह्यातील ४ वर्षाची धनश्री एका वर्षांपासून कार्डीओमायोपथी या आजाराने त्रस्त होती. धनश्रीचे हृदय केवळ १५ टक्के चालू होते. तिला हृदय प्रत्यारोपणची आवश्यकता होती. अशातच औरंगाबाद येथे झाल्येल्या अपघातात १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पण मृत मुलाच्या पालकांनी मुलगा गेल्याचा शोक न करत मुलाचे हृदय धनश्रीला देण्याचे ठरवले. आता मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये धनश्रीची हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली अाहे.


मुलीचा जीव वाचवण्यासाठी धडपड

जालना जिल्ह्यातील सरवाडी गावातील चार वर्षाची धनश्री मुजमुले हिला गतवर्षी कार्डीओमायोपथी नावाचा हृदयसंदर्भातील गंभीर आजार झाला होता. यामध्ये हृदयातून तयार झालेले रक्त शरीराच्या इतर भागात पोचण्यास अडथळा होतो.  परिणामी रुग्णांची शारीरिक परिस्थिती अजूनच खालावत जाते. वैद्यकीय चाचण्यांकरता धनश्रीला दर महिन्यातून दोन वेळा रुग्णालयात यावे लागत असे. अखेर डॉक्टरानी धनश्रीला हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे आणि यासाठी एकूण २५ लाखांचा खर्च होऊ शकतो, असं सांगितलं. यानंतर धनश्रीच्या पालकांनी दीड महिन्यांपूर्वी जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीत नोंदणी केली.

अखेर हृदय मिळाले 

गुरुवारी २१ जून रोजी अचानक हृदय उपलब्ध झाल्याची माहिती कळाली आणि धनश्रीच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. धनश्रीसाठी हृदय हे थेट औरंगाबादवरुन येणार आहे ही माहिती कळताच त्यांना धक्काच बसला. औरंगाबाद येथे १३ वर्षीय मुलाचा रस्त्यात अपघात झाल्याने तातडीने त्याला औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रूग्णालयातील अवयव प्रत्यारोपण विभागाने धनश्रीबद्दल सर्व माहिती त्या मुलाच्या पालकांना दिली. त्यांनी स्वतःला सावरत अगदी काही क्षणातच आपल्या मुलाचे हृदय धनश्रीला दान करण्याचा निर्णय घेतला.


दीड तासातच हृदय मुंबईत 

धनश्रीला हृदयप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेची नितांत गरज होती. त्यामुळे जितक्या लवकर शस्त्रक्रिया
 होईल तितक्या लवकर तिच्यावरचा धोका टळणार होता. औरंगाबाद एमजीएम रुग्णालयातून दुपारी १.५० वाजता हृदय निघाले. अवघ्या दीड तासातच चार्टर विमानाच्या साहाय्याने हृदय औरंगाबादहून मुलुंड येथे आणण्यात आले, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण विभाग प्रमुख डॉ. अन्वया मुळ्ये यांनी दिली. 

 दुपारी ३.२४ ला डॉक्टरांची टीम  हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आणि ३ वाजून ३० मिनिटांनी धनश्रीवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सध्या धनश्री डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून देण्यात आला. हेही वाचा -

'त्यांनी' दिले सहा जणांना जीवदान

अपंगांसाठी योगा 'संजीवनी' - डाॅ. छाया मानेसंबंधित विषय
Advertisement