Advertisement

'त्यांनी' दिले सहा जणांना जीवदान


'त्यांनी' दिले सहा जणांना जीवदान
SHARES

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याची जाण असलेले दिनेश मेहता यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अवयवदान करून सहा जणांचे प्राण वाचवले आहेत.  मूत्रपिंड, डोळे, यकृत अाणि त्वचा त्यांनी दान केली अाहे.

सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात रस असणारे ६४ वर्षीय दिनेश मेहता हे नेहमीच इतरांची मदत करत. वडाळा येथे राहणारे दिनेश यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. २१ जूनला प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. सिटी स्कॅन आणि अन्य चाचण्या केल्यानंतर त्यांना ब्रेनडेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मुलाच्या वाढदिवशीच निधन

२३ जूनला दिनेश मेहता यांचं निधन झालं.  त्यादिवशी त्यांच्या मुलाचा म्हणजेच समीरचा वाढदिवस होता. वडील जगात नाही ही गोष्ट त्यांना न पचणारी होती. पण अवयवदानाचा निर्णय हा सर्वात महत्वाचा आहे, असं म्हणत समीर यांनी त्यांच्या वडिलांचे मूत्रपिंड दोन व्यक्तींना, डोळे दोन व्यक्तींना तसेच यकृत एकाला दान केले आणि त्यांची त्वचादेखील दान केली. अशा प्रकारे दिनेश यांनी मरणानंतरदेखील सहा जणांचे प्राण वाचवले


अवयवदानाची इच्छा

दिनेश नेहमीच गरिबांची मदत करायचे.  कधी गरिबांच्या मुलांची शाळेतील फी भरायचे. तर कधी त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत करायचे. त्यांना सर्वांना मदत करणं आवडायचं, असं त्यांचे पुत्र समीर मेहता यांनी सांगितलं. सर्वांना मदत करण्याच्या स्वभावामुळे आपण मरणानंतरदेखील लोकांच्या कामी यावं अशी इच्छा त्यांनी वर्तवली होती. त्यामुळेच मेहता परिवाराने दिनेश यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. 



हेही वाचा - 

अपंगांसाठी योगा 'संजीवनी' - डाॅ. छाया माने

सेंट जॉर्जेस रुग्णालयात होणार लिंगपरिवर्तन विभाग



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा