‘चित्रकले’द्वारे उच्च रक्तदाबावर मात

  मुंबई  -  

  मन मोहून टाकणारे रंग आणि त्यातून चित्र साकार करणाऱ्या या रेषा. चित्रकला हा छंद जोपासलेल्या अनेक चित्रकारांना आपण पाहिलं असेल. मात्र उच्च रक्तदाबावर थेरेपी म्हणून चित्र साकारणाऱ्या मंगल गोगटे यांना पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. उच्च रक्तदाबासारख्या समस्येवर मात कशी करता येऊ शकते? याचे उत्तर चित्रांमध्ये दडल्याचे त्या सांगतात.

  कला कोणतीही असो. गायन असो, चित्रकला असो किंवा नृत्यकला. यातील प्रत्येक कला आपल्या शरीराला आणि मनाला विरंगुळा देते. म्हणूनच बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारा तणाव आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांशी सामना करण्यासाठी डॉक्टर्स अनेकदा पेशंटला या थेरेपीचा सल्ला देतात.
  - डॉ. विजय पन्नीकर, मधुमेह तज्ज्ञ

  17 मे हा जगभरात उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने चित्रकार मंगल गोगटे यांची ही थेरेपी उच्च रक्तदाबाशी सामना करणाऱ्या अनेकांसाठी नक्कीच आदर्श ठरु शकते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.