Advertisement

आता एनएमसी बिलासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचं आमरण उपोषण!


आता एनएमसी बिलासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचं आमरण उपोषण!
SHARES

'राज्यातील ऑल इंडिया होमिओपॅथिक डॉक्टर्स' या संघटनेने आपल्या काही मागण्यांसाठी आमरण उपोषण आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सोमवारपासून होमिओपॅथिक डॉक्टरांनी राज्यभरात आमरण उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच एनएमसी या बिलातील तरतुदी आहे तशाच रहाव्यात, या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हे होमिओपॅथिक डॉक्टर आणि विद्यार्थी उपोषणासाठी बसले आहेत.


१५० डॉक्टर बसले उपोषणाला

'नॅशनल मेडिकल कमिशन' या बिलाला सध्या डॉक्टरांच्या संघटनेकडूनही विरोध होत आहे. पण, होमिओपॅथिक डॉक्टरांनी मात्र या बिलातील तरतुदी आणि त्यातून वगळण्यात आलेला ब्रिज कोर्स तसाच राहावा यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईसह राज्यभरातील साधारणतः १५० डॉक्टर्स आणि विद्यार्थी हे आंदोलन करत आहेत.


'ब्रिज कोर्स तसाच ठेवा'

२८ मार्च २൦१८ ला संसदीय स्थायी समितीला एनएमसी बिलातून ब्रिज कोर्स वगळण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटने दिला. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ७൦ हजार आणि भारतातील ४ लाख होमिओपॅथिक डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणून केंद्र सरकारला विनंती करण्यात येत आहे. शिवाय, उपोषणाला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास त्याचं रुपांतर जेल भरो, रास्ता रोको, रेल रोको अशा हिंसक गोष्टींमध्ये होईल, असंही या संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

हा सरकारचा दुजाभाव आहे. आपलं राज्य हे आरोग्य सेवेच्या यादीत १७९ मध्ये १५६ व्या क्रमांकावर आहे. जे लोक एनएमसी बिलाला विरोध करत आहेत, त्यांना डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन एनएमसीमध्ये होऊ द्यायचं नाहीये.

डॉ. प्रकाश राणे, ऑल इंडिया होमिओपॅथिक डॉक्टर्स फेडरेशन


डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या

० एनएमसी बिलातील ब्रिज कोर्स तसाच रहावा
० Affirmative शब्दाचा निकष नसावा, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारडे पाठपुरावा करावा
० होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक औषधी शास्त्राच्या कोर्स असण्याबद्दल राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी
० राज्यात होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी
० सीसीएमपी कोर्सच्या जागा या वर्षी किमान १൦ हजारने वाढवाव्यात
० सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी एमएमपी कायदा २०१४ मधील बदलानुसार व्हायला हवीहेही वाचा

डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा