Advertisement

मुलांनो सुट्टीत जरुर खेळा, नाहीतर वाढेल लठ्ठपणा


मुलांनो सुट्टीत जरुर खेळा, नाहीतर वाढेल लठ्ठपणा
SHARES

यापूर्वी परीक्षा संपल्यावर शाळेला सुट्टी लागली की मुलं खेळायला पळायची. आता तसं होताना दिसत नाही. कारण, सतत मुलं मैदानी खेळं खेळण्यापेक्षा मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे मैदानी खेळ खेळले जात नसल्यानं त्यांचं वजन वाढतं.

"इतकं चॉकलेट खाणं बरं नाही, "कोला जास्त प्यायल्यास जाडा होशील, असे उपदेश देणारे आई-वडिल आपण पाहिले असतील. जगभरातील लठ्ठ व्यक्तींच्या आकडेवारीत वाढ होत चालली असताना मुलांच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैली पालकांच्या काळजीचा विषय बनणं साहजिकच आहे.


लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढीस लागली आहे. आताच्या जगात दर पाच मुलांमागे एक मूल आणि एक किशोरवयीन मुलगा/ मुलगी लठ्ठ असतात. या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. जवळपास ३൦ टक्क्यांहून अधिक मुलांना लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलं आहे. ही समस्या बालपणातील सर्वात गंभीर समस्या आहे. काही मुलांची शरीरयष्टीच स्थूल असते. तर, काही मुलांच्या शरीराची वाढ होत असताना वेगवेगळ्या प्रमाणात मेदशरीरात साठत जातो. त्यामुळे मुलांकडे नुसतं पाहून त्यांचं वजन त्यांच्या आरोग्याला मारक आहे किंवा नाही हे ठरवता येत नाही.
डॉ. मनिष मोटवानी, बॅरिअॅट्रिक सर्जन, आस्था हेल्थकेअर


मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची कारणं

 • सतत फास्ट फूड, बेकरी पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स, कँडी आणि मिठाई खाणे
 • व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचालीचे खेळ न खेळल्याने वा टीव्ही पाहणे, व्हिडीयो गेम्स खेळणे
 • बैठ्या कामांमुळे लठ्ठपणाची समस्या अधिकच तीव्र होते
 • लठ्ठपणा तुमच्या घराण्यातच असेल तर मुलाचे अथवा मुलीचे वजन जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही
 • काही मुलं अभ्यासाचा ताण आणि कंटाळावर मात करण्यासाठी खाण्याचा पर्याय निवडतात


लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे करा

 • गोड शीतपेये पिण्यावर मर्यादा घाला
 • भरपूर फळे, भाज्या खायला द्या
 • सर्वांनी एकत्र बसून जेवण करा
 • बाहेरचं खाणं शक्यतो टाळा
 • फास्ट फूड रेस्टॉरण्ट्समध्ये खाणं टाळा
 • वयानुसार वजन किती वाढावं हे ठरवावं
 • टीव्ही आणि इतर स्क्रीन्समोरचा वेळ दिवसाला २ तासांपेक्षा कमीच असूद्या
संबंधित विषय
Advertisement