Advertisement

खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या खाटा कोरोनासाठी

मुंबईतील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के सर्वसाधारण खाटांसह अतिदक्षता विभागाच्या १०० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेनं दिले आहेत.

खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या खाटा कोरोनासाठी
SHARES

मुंबईतील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के सर्वसाधारण खाटांसह अतिदक्षता विभागाच्या १०० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेनं दिले आहेत. या खाटांवर विभागीय नियंत्रण कक्षांद्वारेच रुग्णांना भरती केलं जाणार असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. मुंबईत अनेक खासगी रुग्णालयांमध्ये विभागीय नियंत्रण कक्षाशी समन्वय न ठेवता रुग्णांना थेट दाखल करून घेतलं जात आहे.

खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटांचं नियोजन योग्यरितीनं करण्यासाठी रुग्णांना थेट दाखल न करण्याचे आदेश पुन्हा एकदा महापालिकेनं रुग्णालयांना दिले आहेत. तसंच, विभागातील नर्सिंग होम, खासगी रुग्णालयातील सर्व खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ताब्यात घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

रुग्णालयं यासाठी तयार होत नसल्यास स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात यावी. तसंच, विभागीय नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचेही आदेश महापालिकेनं दिले आहेत. लक्षणंविरहीत कोरोनाबाधितांना दाखल करू नये. तसंच, असे रुग्ण दाखल केले असल्यास त्यांना तातडीनं घरी सोडण्यात यावं, असंही महापालिकेनं रुग्णालयांना सूचित केले आहे.



हेही वाचा -

नियम न पाळल्यास राज्यात लॉकडाऊन, लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शरद पवारांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, बुधवारी शस्त्रक्रिया


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा