Advertisement

कोरोनाकाळात मुंबई आयआयटीनं निर्मित केले ४० संशोधन प्रकल्प

कोरोनावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन सुरू करण्यात आले आहेत.

कोरोनाकाळात मुंबई आयआयटीनं निर्मित केले ४० संशोधन प्रकल्प
SHARES

मुंबईसह जगभरात कोरोनाच्या (corona) वाढत्या प्रादुर्भावानं धुमाकूळ घातला होता. दिवसाला ७०० ते १००० रुग्णांची भर पडत होती. त्यात अनेकांचा मृत्यूही जात होता. परंतू, कोरोनावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन सुरू करण्यात आले आहेत. मुंबई आयआयटीनं (iit bombay) ही सोशधनाला सुरूवात केली असून, ४०हून अधिक प्रकल्पांचं (project) काम आयआयटी मुंबईच्या संशोधन व विकास विभागानं हाती घेतलं आहे.

कोरोनाच्या काळात निर्मिती केलेल्या आयआयटी मुंबईच्या १३ संशोधनांना २२ कंपन्यांकडून आतापर्यंत परवाने मिळाले आहेत. काही सध्या विविध रुग्णालये, उद्योगात वापरात असून काही बाजारात उपलब्ध आहेत, तर काहींची परवानगी प्रक्रिया सुरू आहे. ड्युराप्रोट या मास्कची (mask) निर्मिती करण्यात आली असून ई-कॉमर्स संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. यूव्हीसी बेस्ड पोर्टेबल सॅनिटायझेशन युनिट्सलाही परवाना मिळाला आहे.

सॅनिटायझेशन, वैद्यकीय उपकरणं, वैयक्तिक सुरक्षितता, अँटिव्हायरल औषधं, आयटी सोल्युशन्स, डायग्नोस्टिक अप्रोचद्वारे ४०हून अधिक प्रकल्पांची निर्मिती आयआयटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागानं केली. हॅन्डरब सॅनिटायझर्स, सर्फेस स्प्रे, बायोडिग्रेडेबल फेस शिल्ड्स, कोविड माइल्ड पेशंटसाठी हेल्मेट, श्वासोच्छश्वासाचा त्रास असणाऱ्यांसाठी अंबू बॅग्स, ॲडव्हान्स्ड व्हेंटिलेटर्स, आयसीयू व्हेंटिलेटर्स अशा प्रकल्पांवर चाचणीनंतरची प्रक्रिया करण्यात येत आहे. 

ओडिशा व मेघालय इथं वापरण्यात येणारे व क्वारंटाइन लोकांसाठी तयार केलेले क्वारंटाइन ॲप, लक्षणे असलेल्या, नसलेल्या लोकांचा मागोवा घेणारे सेफ ॲप आदी आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून संशोधनाअंती तयार केलं आहेत.



हेही वाचा - 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा