Advertisement

प्लाझ्मा दान बंधनकारक करावं, IMA च्या सूचना

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करणं बंधनकारक करावं, अशी सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) महाराष्ट्र शाखेनं सरकारकडे केली आहे.

प्लाझ्मा दान बंधनकारक करावं, IMA च्या सूचना
SHARES

कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर सध्या कुठलीही लस सापडली नाही. दुसऱ्या आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांच्या मदतीनं कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या सर्वात फायदेशीर ठरत आहे ती प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy).

कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करणं बंधनकारक करावं, अशी सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) महाराष्ट्र शाखेनं सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र IMA नं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रुग्ण कोरोनातून बरा झाल्यानंतर पंधराव्या दिवशी त्याला पुन्हा तपासणीसाठी बोलवावं. त्यावेळी त्याची सर्वसाधानरण तपासणी करून तो तंदुरूस्त असल्याची खात्री करावी आणि मग त्याला प्लाझ्मा दान करण्यास प्रोत्साहीत करावं. अशा दात्यांच्या रक्तसंकलनासाठी सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील रक्तपेढीच्या मदतीनं प्रत्येक महत्त्वाच्या शहरात आणि गावात प्लाझ्मा बँक तयार करावी. महामारी कायदा 1897 मधील तरतुदींनुसार सरकार एक अध्यादेशा काढून प्लाझ्मा संकलनासाठी रक्तदानाची प्रक्रिया बंधनकारक करू शकते.

महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "अशा पद्धतीने प्लाझ्माची उलपब्धता आणि त्याचा वापर वाढवल्यास महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांच्या आजारातून मुक्त होण्याचा दर तर वाढेलच पण राज्यातील मृत्यूदरही आटोक्यात येईल, असा आम्हाला विश्वास आहे"

ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यांना ऑक्सिजनवर ठेवावं लागत आहे, आयसीयूमध्ये दाखल करावं लाग आहे, अशा रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी जीवनरक्षक म्हणून प्रभावी ठरल्याचं दिसलं आहे. त्यामुळे त्याचा वापर अधिकाधिक रुग्णांवर केला गेला पाहिजे. पण प्लाझ्मा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तदान करणं बंधनकारक करावं, अशी मागणी महाराष्ट्र IMA ने केली आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा