Advertisement

ताप, सर्दी, खोकला आजारांच्या प्रमाणात वाढ


ताप, सर्दी, खोकला आजारांच्या प्रमाणात वाढ
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून घसरलेलं तापमान आणि अचानक वाढलेला गारठा यामळं कोरोनाव्यतिरिक्त ताप, सर्दी, खोकला अशा अन्य विषाणूजन्य आजारांचं प्रमाण जवळपास २० टक्क्यांनी वाढलं आहे. कोरोनामध्येही अशाच प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं नागरिकांनी वेळीच डॉक्टरांकडं जाऊन यांचं निदान आणि उपचार करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

शहरात अनेक ठिकाणी सकाळी धुरके दिसू लागले आहे. सकाळच्या हवेतील गारवाही वाढला आहे. यामुळं प्रदूषणाचं प्रमाणही काही अंशी वाढलं आहे. वातावरणातील हे बदल विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळं गेल्या काही दिवसांत ताप, सर्दी, खोकला, घसादुखी अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची गर्दी वाढली आहे.

अन्य विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून नक्कीच वाढला असून हे प्रमाण जवळपास २० टक्के आहे. लक्षणे समान असली तरी कोरोनाची भीती बाळगून डॉक्टरांकडे न जाणे अधिक धोक्याचं आहे. औषधांच्या दुकानातून औषधे न घेता डॉक्टरांकडून उपचार करणं अधिक फायदेशीर आहे. 

'अशी' घ्या काळजी

  • धुरके वाढल्यानं सकाळच्या वेळेत फिरायला जाणं शक्यतो टाळावे. 
  • दमा, अस्थमाच्या रुग्णांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. 
  • हवेत गारठा वाढल्याने या रुग्णांनी शक्यतो कोमट पाणी प्यावे. 
  • दिवसातून दोन वेळेस हलकी वाफ घ्यावी. 
  • थंडीमध्ये पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते, तेव्हा भरपूर पाणी प्यावं.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा