Advertisement

'लाइफलाइन एक्सप्रेस्' ठरणार तारणहार


'लाइफलाइन एक्सप्रेस्' ठरणार तारणहार
SHARES

अत्याधुनिक हाॅस्पिटल ट्रेनचा लाभ अाता महाराष्ट्रातील रूग्णांना मिळणार अाहे. 'लाइफलाइन एक्सप्रेस्' ही जगातली पहिली अत्याधुनिक हॉस्पिटल ट्रेन सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. मुंबईमधून हा दौरा बुधवारी सुरू झाला असून महाराष्ट्रात सर्वप्रथम या ट्रेनचा लातूर येथे मुक्काम असणार आहे. १८ अत्याधुनिक सुविधा या ट्रेनमधून मिळत अाहेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही ती फिरणार असून त्यानंतर भारत दौऱ्याला रवाना होईल. भारतीय रेल्वे आणि इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 'लाइफलाइन एक्सप्रेस्' ट्रेन रुग्णांच्या सेवेत आहे. ही एकमेव ट्रेन आहे जी चालत फिरत रुग्णांची सेवा करते. ही ट्रेन नेमकी कशी अाहे आणि तिचं कामकाज कसं चालतं हे जाणून घेऊया या रिपोर्टमधून.


जन्म 'लाइफलाइन एक्सप्रेस्' चा

भारतातील काही ग्रामीण भागात अजून आधुनिक आरोग्यसुविधा पोहचल्या नाहीत. तसेच येथील नागरिकांना उपचाराचा खर्चही पेलत नाही. या नागरिकांसाठी १६ जुलै १९९१ ला प्रथम 'लाइफलाइन एक्सप्रेस्' धावली. ही ट्रेन रुग्णांसाठी मोफत दरामध्ये आरोग्यसेवा पुरवते. त्यावेळी ही ट्रेन फक्त पाच कोचमध्ये उपलब्ध होती. मूक-बधीर , चेहऱ्यावरील विकृतीपणा आणि दातांच्या समस्यांवर 'लाईफलाईन एक्सप्रेस' काम करायची. 'लाइफलाइन एक्सप्रेस्' ने अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट लोकसेवा पुरस्कार मिळवला आहे.


कॅन्सर आणि कुटुंब आरोग्यसेवा सुविधा

डिसेंबर २०१६ मध्ये 'लाइफलाइन एक्सप्रेस्' ५ डब्या ऐवजी ७ डब्यांसोबत धावू लागली. त्याचबरोबर कॅन्सरवरील उपचार आणि कुटुंब आरोग्य सेवाही या ट्रेनमध्ये मिळू लागल्या अाहेत. 'लाइफलाइन एक्सप्रेस्' मध्ये तोंड, गर्भाशय आणि स्तनाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक उपचार आणि सामान्य आरोग्य विभाग आहे. १० हजार रुग्णांवर उपचार या प्रवासामध्ये केले गेले आहेत.


अत्याधुनिक सुविधा

एखाद्या मोठ्या हॉस्पिटलसारखी दिसणाऱ्या या चालत्या फिरत्या 'लाइफलाइन एक्सप्रेस्' मध्ये ऑर्थोपेडिक, ओपथिलमीक, मध्यम कान ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, कुटुंब नियोजन , स्त्रीरोग आणि कर्करोग विभाग, दात आणि आरोग्य स्वछता विभाग, एड्स आणि हेल्थ प्रोग्रॅमसारख्या सुविधा आहेत. भारतातील बहुतांश लोकांना उपचारासाठी पैसे नसतात किंवा ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा तुटवडा आहे त्या सर्व लोकांसाठी ही एक्सप्रेस् 'लाइफलाइन' ठरली आहे. रुग्णांच्या तपासणीनंतर त्यांच्या फेर तपासणीसाठी शासकीय रुग्णालयासोबत हातमिळवणी केल्याने 'लाइफलाइन एक्सप्रेस्' च्या रुग्णांना त्या गावातील शासकीय रुग्णालयात फेरतपासणी करता येते.


मुंबईतील रुग्णालयांशी हातमिळवणी

मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालयांनी या ''लाइफलाइन एक्सप्रेस्' शी हातमिळवणी केली आहे. सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर या मोहिमेत कार्यरत असून भारतभर रुग्णांची सेवा करतात. तसेच मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर या ट्रेनमध्ये अापली सेवा देत अाहेत.


हेही वाचा -

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर कार्यमुक्त

गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतरही प्रसूती? सायन रुग्णालयाचा अक्षम्य हलगर्जीपणा!

कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आता नवी 'आशा'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा