Advertisement

गुड न्यूज! देशभरात ‘या’ तारखेपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात

कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरूवात झालेली असताना भारतात देखील लसीकरणाऱ्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.

गुड न्यूज! देशभरात ‘या’ तारखेपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात
SHARES

कोरोना विषाणूला (coronavirus) हद्दपार करण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरूवात झालेली असताना भारतात देखील लसीकरणाऱ्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना प्राधान्यक्रमाने कोरोनावरील लस दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार ९ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कॅबिनेट सेक्रेटरी, आरोग्य सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली.

सर्वात आधी 'यांना' लस

या घोषणेनुसार शनिवार १६ जानेवारी २०२१ पासून म्हणजेच बरोबर आठवड्याभराने देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. कोरोना लसीकरणाऱ्या पहिल्या टप्प्यात जवळपास ३ कोटी फ्रंटलाईन कोरोना योद्धा आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येईल. त्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयांच्या नागरिकांना तसंच एखाद्या जुन्या आजारानं त्रस्त (को-मोर्बिडीटी असणाऱ्या) असलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाईल. या सर्वांची मिळून संख्या २७ कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा- मेसेज येणार तरच कोरोना लस मिळणार- राजेश टोपे

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. या लसी देशभरातील नागरिकांना देण्यात येणार आहे.

देशात आतापर्यंत १ कोटी ०४ लाख ३२ हजार ५२६ जणांना कोरोनाची (covid19) बाधा झाली असून त्यापैकी तब्बल १ कोटी ५५ हजार ९३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. केवळ २ लाख २१ हजार ४४७ कोरोना रुग्णांवर सध्या देशभरात उपचार सुरू आहेत. तर १ लाख ५० हजार ८३५ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे.

'अशी' मिळेल लस

कोरोनामुळे जीववीतहानी बरोबर लाॅकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी देखील झाली आहे. कोट्यवधी लोकांनी आपले रोजगार गमावले आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लसीकरणाचा ड्राय रन नुकताच घेण्यात आला होता.

दरम्यान महाराष्ट्रात मतदानासाठी ज्या पद्धतीने बूथ उभारले जातात त्याच पद्धतीने लसीकरणासाठी बूथ उभारले जातील. ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. तो मेसेज आल्यावर संबंधित व्यक्तिला दिलेल्या ठिकाणी ओळखपत्रासह जावं लागेल. त्याची ओळख पटल्यावर लस दिली जाईल. त्यानंतर तिथं अर्धा तास थांबवून नंतर पाठवलं जाईल, अशी माहिती आराेग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

हेही वाचा- ठाण्यात पार पडला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा