Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

भारतीयांना यावर्षीच्या ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये २१६ कोटी डोस मिळणार

गुरुवारी निती आयोगाचे सदस्य व्हिके पॉल यांनी या संदर्भात माहिती दिली.

भारतीयांना यावर्षीच्या ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये २१६ कोटी डोस मिळणार
SHARES

गुरुवारी निती आयोगाचे सदस्य व्हिके पॉल यांनी यावर्षीच्या ऑगस्ट ते डिंसेबरमध्ये ५ महिन्यांत २१६ कोटी डोस देणार असल्याचं सांगितलं आहे. पॉल पुढे म्हणाले की, एफडीए किंवा डब्ल्यूएचओनं मंजूर केलेल्या कोणत्याही लसीला भारतात येण्यास परवानगी दिली जाईल.

पराराष्ट्र मंत्रालय जगातील इतरही लस उत्पादकांशी संपर्कात असून फायजर, मॉडर्ना आणि जॉनसन आणि जॉनसन यांचा आधीच सांगितलं असल्याचं पॉल म्हणाले. दरम्यान, या कंपन्यांना आयात संबंधीची परवानगी एक ते दोन दिवसांत देण्यात येणार आहे. जर लस उत्पादक कंपन्या भारतात येऊन काम करत असतील त्याला केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचं पॉल यांनी सांगितलं.

देशात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १७.७२ कोटी डोस देण्यात आले. तर अमेरिका २६ कोटीसह प्रथम क्रमांकावर असून चीन दुसर्‍या स्थानांवर आहे. देशात पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं पॉल यांनी सांगितलं. रशियामधून गेल्या काही दिवसांपासून लसीचा पुरवठा कमी होता. परंतु, तो आता वाढणार असल्याचंदेखील ते म्हणाले.हेही वाचा

महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्यमंत्र्यांनी केली केंद्राकडे इंजेक्शनची वाढीव मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा