ज्युपिटर रुग्णालयात नव्या जेसीआय ओपीडीची सुविधा


ज्युपिटर रुग्णालयात नव्या जेसीआय ओपीडीची सुविधा
SHARES

सर्वांना किफायतशीर दराने दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी ज्युपिटर चॅरिटेबल इन्स्टिट्यूट (जेसीआय)ने ओपीडी सुरू केली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे मनपा आयुक्त संजीव जैसवाल यांच्या उपस्थितीत या सुविधेचं लोकार्पण करण्यात आलं.


कशी असेल सुविधा?

प्रत्येक शनिवारी, दुपारी ३ वाजल्यापासून, सर्व स्पेशालिटीजचे डॉक्टर ज्युपिटर हॉस्पिटलच्या आऊट पेशंट डिपार्टमेंट (ओपीडी)मध्ये उपलब्ध असतील. कोणत्याही प्रकारच्या कन्सल्टेशनसाठी १०० रु शुल्क आकारण्यात येणार आहेत. सल्ला देण्यात आलेल्या कोणत्याही तपासणीवर ३५ टक्के अनुदान दिलं जाईल आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या कोणत्याही उपचार/सर्जरीवर ४०टक्के अनुदान दिलं जाईल.

गुणवत्ता कमी करून खर्च कमी करता येऊ शकत नाही. आपल्याला याची खात्री करणे आवश्यक आहे की रुग्णाला एंड-टू-एंड उपचारासाठी ज्युपिटर चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची एक अतुलनीय योजना आहे आणि एक उत्तम पुढाकार आहे.

- एकनाथ शिंदे, पालक मंत्री, ठाणे

दर्जेदार आरोग्यसेवेचा पूर्ण खर्च न पडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या सेवेचा लाभ घेता येणार आहे. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने जेसीआय वॉर्डमध्ये अनुदानित उपचार मिळावं, यासाठी रुग्णांना सेल्फ-डिक्लेरेशन फॉर्मवर सही करावी लागेल. या अर्जावर सही करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या उपक्रमांतर्गत लाभ मिळवता येईल. यासंबंधी आणखी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही

केवळ अनुदानित ओपीडी कन्सल्टेशन दिलं जाणार नाही, तर तपासणी आणि उपचार या बाबतीत साहाय्य करून रुग्णांना निदान आणि उपचार दिलं जाणार आहे. आज, समाजातील एक मोठा मध्यम वर्ग आहे. ज्याला आरोग्याच्या समस्यांवर परवडणारे उपाय हवे आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये जायचे नाही आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल परवडत नाही. उपचाराचा संपूर्ण खर्च परवडणार नाही, असे अर्ज भरताना नमूद करणारा कोणताही रुग्ण जेसीआयमध्ये अनुदान मिळण्यासाठी पात्र असेल.
- डॉ. अंकित ठक्कर, कार्यकारी संचालक, ज्युपिटर हॉस्पिटल

संबंधित विषय