Advertisement

Coronavirus updates लस चाचणीसाठी स्वयंसेवकांची गरज


Coronavirus updates लस चाचणीसाठी स्वयंसेवकांची गरज
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी असला तरी सुरुवातीला कोरोना संसर्गाचा प्रसार ज्या भागामध्ये सर्वाधिक झाला, अशा भागातील वयस्कर व्यक्तींना 'बीसीजी'ची लस दिली जात असून, या लसीमुळे या आजाराला प्रतिबंध होण्यासह श्वसनमार्गाशी संबधित आजारांचा प्रादुर्भाव कमी होतो का, यासंदर्भात संशोधन सुरू आहे. या वैद्यकीय संशोधनाच्या अंतर्गत आतापर्यंत ९०हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना बीसीजीची लस देण्यात आली आहे.

या कामासाठी अजूनही काही स्वयंसेवकांचा सहभाग पाहिजे आहे. आयसीएमआरकडून (icmr) सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला बीसीजी लसीचा एक डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील ६ महिने या व्यक्तीचे वैद्यकीय परीक्षण करण्यात येणार आहे.

चाचणीच्या उद्देशाने काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. या सर्व चाचण्या विनामूल्य आहेत. मधुमेह, उच्चरक्तदाब तसेच इतर व्याधी असलेल्या व्यक्तींमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसते. क्षयरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लहान मुलांमध्ये बीसीजी लस देण्यात येते. ही लस दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसनविकारांचा प्रतिबंध होतो का? याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

सहभागी होणाऱ्या ज्या वृद्धांनी बीसीजी लस लहानपणी घेतलेली आहे, त्यांनाही ती चाचण्या झाल्यानंतर परत देण्यात येईल. विविध प्रकारच्या श्वसनविकारांना या लसीमुळे प्रतिबंध होतो का? तसेच करोना वा क्षयरोगाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी ही लस उपयोगी ठरते का? यासंदर्भात अद्याप निश्चित कोणतेही भाष्य करता येत नाही.

'आयसीएमआर'ने यासंदर्भातील अभ्यास १० ठिकाणी सुरू केला आहे. त्यात केईएम रुग्णालयाचाही समावेश आहे. या वैद्यकीय संशोधनामध्ये ६० ते ६५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. सहभागी होणाऱ्या व्यक्तीला एचआयव्ही, तसेच कोरोना संसर्ग असू नये, तसेच क्षयरोग, कॅन्सरचीही लागण असल्यास या संशोधनामध्ये सहभागी होता येणार नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा