Advertisement

कोरोनाच्या चाचण्या 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, आरोग्य विभागाचे आदेश

कोरोना चाचणीसाठी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांमध्ये तब्बल साडेचार हजार रुपये आकारले जात होते. यातून रुग्णांची लूट होत असल्याचा प्रकार सोमर आला.

कोरोनाच्या चाचण्या 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, आरोग्य विभागाचे आदेश
SHARES

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोना चाचण्या स्वस्त झाल्या आहेत.  कोरोना तपासणीसाठी लागणारे रिएजंट्स, व्हीटीएम किट‌्स, पीपीई किट्सची उपलब्धता वाढली आहे. परिणामी त्यांचे बाजारभाव कमी झाले आहेत. याचाच फायदा आता कोरोनाची चाचणी करायला जाणाऱ्या रुग्णांना होणार आहे.

कोरोना चाचणीच्या शुल्कामध्ये ६०० रुपयांची कपात झाली आहे. स्वतः प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास पूर्वी २ हजार ५०० रुपयांचे शुल्क आकारले जात होते. यापुढे १ हजार ९०० रुपये एवढेच शुल्क आकारले जातील. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास २ हजार ८०० रुपयांऐवजी २५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. राज्याच्या आरोग्य विभागानं हा निर्णय घेतला आहे.

कोरोना चाचणीसाठी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांमध्ये तब्बल साडेचार हजार रुपये आकारले जात होते. यातून रुग्णांची लूट होत असल्याचा प्रकार सोमर आला. आता ‘आरटीपीसीआर’ चाचणी दरात कपात करण्याचा निर्णय सरकारनं ७ ऑगस्ट रोजी घेतला आहे.

हेही वाचा : ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब दिल्यास

आरटीपीसीआर : १९०० रुपये

अँटिजन टेस्ट : ६०० रुपये

अँटिबॉडी टेस्ट : ४५० ते ५०० रु.

हॉस्पिटल, कोविड केंद्रावरून स्वॅब घेतल्यास

आरटीपीसीआर : २२०० रुपये

अँटिजन टेस्ट : ७०० रुपये

अँटिबॉडी टेस्ट : ५०० ते ६०० रु.

लॅबनं घरी जाऊन स्वॅब घेतल्यास

आरटीपीसीआर : २५०० रुपये

अँटिजन टेस्ट : ८०० रुपये

अँटिबॉडी टेस्ट : ६०० ते ७०० रु.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे आता कोरोना तपासणीसाठी लागणारे रिएजंट्स, व्हीटीएम किट‌्स, पीपीई किट्सची उपलब्धता वाढली. त्यामुळे बाजारात या सर्वांचे भाव कमी झाले. त्यामुळे समितीनं पुन्हा खासगी प्रयोगशाळांशी चर्चा केली. त्यानंतर आरटीपीसीआर, अँटिजन आणि अ‍ॅँटिबॉडी टेस्टचे दर घटवून निश्चित करून दिल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


हेही वाचा

धारावी मॉडेलची ऑस्ट्रेलियाच्या वृत्तसंस्थेकडूनही दखल

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

Read this story in English
संबंधित विषय