Advertisement

धारावी मॉडेलची ऑस्ट्रेलियाच्या वृत्तसंस्थेकडूनही दखल

मुंबई महापालिका व राज्य सरकारनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. धारावीच्या या यशाची दखल आता ऑस्ट्रेलियातील एबीसी न्यूज या सरकारी वृत्तसंस्थेनेही घेतली आहे.

धारावी मॉडेलची ऑस्ट्रेलियाच्या वृत्तसंस्थेकडूनही दखल
SHARES

मुंबईतील धारावी हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. मात्र, आता धारावीमधील कोरोना नियंत्रणात आला आहे. मुंबई महापालिका व राज्य सरकारनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. धारावीच्या या यशाची दखल आता ऑस्ट्रेलियातील एबीसी न्यूज या सरकारी वृत्तसंस्थेनेही घेतली आहे.  


याआधी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आणि अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने धारावीतील कोरोना रोखण्याच्या पॅटर्नचं कौतुक केलं होतं. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अरुंद गल्ल्या, दाटीवाटीची वस्ती, आरोग्य सुविधांचा अभाव, अस्वच्छता आणि सार्वजनिक शौचालय असलेल्या धारावीत कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यानंतर मुंबई महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनांमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. येथील कोरोना नियंत्रणाच्या धारावी माॅडेलची दखल संपूर्ण जगाने घेतली. 


धारावीत सध्या केवळ ८८ रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलियातील एबीसी न्यूज या सरकारी वृत्तसंस्थेने धारावीतील कोरोना मुक्तीसाठी मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे.  गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनेही धारावी मॉडेलचं कौतुक केलं होतं, तर वॉशिंग्टन पोस्टनेही याची दखल घेतली होती. आता खुद्द ऑस्ट्रेलिया सरकारचं एबीसी न्यूजने याची दखल घेतली आहे.  हेही वाचा -

धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही

कल्याण डोंबिवलीमध्ये २०१ नवे रुग्ण

ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ
Read this story in हिंदी
संबंधित विषय