अॅन्टॉप हिल - IIT Bombay यांच्या वतीने रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातील नागरिकांनी मोफत मधुमेह तपासणी केली. जगातील लोकांना मधुमेहाबद्दल जागरूकता आणि आजारापासून मुक्त करावे हा या कार्यक्रम शिबिराचा मुख्य उद्धेश आहे. तसेच 'डॉ. प्रदीप गाडगे' मुंबईचे अग्रगण्य मधुमेह तज्ञ यांनी आजपर्यंत मधुमेहाचे कठीणातले कठीण केसेस सुखरूपपणे हाताळून (Guinness world record 2013) मध्ये सर्वात मोठे मधुमेह आरोग्य (screening) पार पाडले. तसेच अनेक मधुमेह निगडीत परिसंवादाचे कार्यक्रम त्यांनी आयोजले होते. याच कारणामुळे IIT Bombay मधील विद्यार्थ्यांनी जग हे मधुमेह मुक्त करावे असा संकल्प केला. डॉ. प्रदीप गाडगे यांचा ही रेकॉर्ड ब्रेक करून जगात मधुमेहापासून रुग्णांना मुक्त करायचे धोरण या कार्यक्रमानिमित्त आखण्यात आले. शिबिरादरम्यान दिल्या जाणाऱ्या माहिती पुस्तकात मधुमेह संदर्भात कुठली काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती देण्यात आली आहे.