Advertisement

वाशीतील कोरोना केंद्रात तणावमुक्तीसाठी ग्रंथालय, पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम

या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके आहेत.

वाशीतील कोरोना केंद्रात तणावमुक्तीसाठी ग्रंथालय, पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम
SHARES

कोरोना रुग्णांचा कोव्हीड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा व त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी याकरिता सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटरमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देत त्यांच्याकरिता पुस्तकांचं अनोखं विश्व खुलं करून देण्यात आलं आहे. अशाप्रकारे कोव्हीड सेंटरमधील कोरोनाबाधितांना पुस्तकांच्या स्वरूपात मानसिक बळ देणारा 'कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय' हा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका आणि लेट्स रीड फाऊंडेशन यांच्या  संयुक्त विद्यमाने 'कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय' हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्ण विलगीकरणासाठी कोव्हीड सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे बराच वेळ असतो. कुटुंबापासून दूर एकटेच असलेल्या वेळेत आजाराविषयी तोच तोच विचार करून रूग्णाचे मनोबल कमी होण्याचा संभव असतो. अशावेळी त्याला माहिती, मनोरंजनपर विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यास तो त्या विचारांपासून काही प्रमाणात दूर जाऊन पुस्तकांच्या जगात रमू शकतो. 

याव्दारे त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होऊन त्याची उमेद वाढू शकते. याच विचारांतून 'लेट्स रीड फाऊंडेशन' या समर्पित भावनेने व्यापक वाचक चळवळ राबविणा-या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटरमध्ये हा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे.

या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके आहेत.  ही पुस्तके ठेवण्यासाठीचे शेल्फही अत्यंत आकर्षक आहे.

कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असण्याच्या कालावधीत लागलेली पुस्तक वाचनाची आवड काहीजण घरी गेल्यानंतरही आवडीने जोपासतील व त्यातून एक व्यापक वाचक चळवळ उभी राहील असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या इतरही कोव्हीड सेंटरमध्येही असा उपक्रम आगामी काळात सुरू केला जाईल असं आयुक्तांनी सांगितलं आहे. 



हेही वाचा - 

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा