Advertisement

भायखळा, परळमध्ये कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक

मुंबई महापालिकेच्या २४ पैकी २१ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत रुग्ण दुपटीचा कालावधी २०० दिवसांपेक्षा अधिक आहे.

भायखळा, परळमध्ये कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५५ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई महापालिकेच्या २४ पैकी २१ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत रुग्ण दुपटीचा कालावधी २०० दिवसांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी चार विभागांमध्ये हा कालावधी ४००, तर पाच विभागांमध्ये ३०० दिवसांहून अधिक आहे.


भायखळ्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सर्वाधिक म्हणजे तब्बल ४८१ दिवसांवर गेला आहे. त्यापाठोपाठ परळमध्ये हा कालावधी ४७८ दिवसांचा तर मरिन लाइन्समध्ये ३७७ दिवसांचा आहे.  सर्वाधिक कमी गोरेगावमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६४ दिवसांचा आहे. कांदिवलीत हा कालावधी १६७ आणि वांद्र्यात १८२ दिवस आहे. 

 गोरेगाव, कांदिवली, वांद्र्यात सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी आहे. या तीन विभागांचा अपवाद वगळता इतर विभागातील कालावधी २०० दिवसांवर गेला आहे. अंधेरी पश्चिमेत  रुग्ण दुपटीचा कालावधी २००, तर कुर्ल्यात २०७ दिवस आहे. 
मुंबईत
सध्या १३,२८५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  तर आतापर्यंत २ लाख ३३ हजार ८०८ रुग्ण बरे झाले आहेत. 


हेही वाचा -

अखेर भाविकांसाठी प्रार्थनास्थळ सुरू

मुंबईत कोरोना रुग्णाच्या दुपटीचा कालावधी २५० दिवसांवर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा