Advertisement

अखेर भाविकांसाठी प्रार्थनास्थळ सुरू

सोमवारपासून प्रार्थनास्थळ उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं सर्व प्रमुख धर्मस्थळांच्या व्यवस्थापनांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून भाविकांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे.

अखेर भाविकांसाठी प्रार्थनास्थळ सुरू
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं. यामुळं वाहतूक सेवेसह प्रार्थनास्थळही बंद ठेवण्यात आले होते. मात्र, हळुहळु अनलॉक होत असून, राज्य सरकारनं वाहतूक सेवेनंतर आता सोमवारपासून प्रार्थनास्थळ उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं सर्व प्रमुख धर्मस्थळांच्या व्यवस्थापनांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून भाविकांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व्यवस्थापनांनी दर्शनासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक केली आहे. अन्य धर्मस्थळेही भाविकांसाठी सज्ज झाली आहेत.

  • देवाच्या दर्शनासाठी मास्क बंधनकारक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • सुरक्षित अंतर नियम पाळून एका वेळी मोजक्या भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
  • सभामंडपात बसण्याची परवानगी सध्या कोणालाही देण्यात आलेली नाही.
  • सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून भाविकांना प्रवेश देण्याची देवस्थाने, प्रार्थनास्थळांनी सज्जता.
  • मास्कचा वापर अनिवार्य, सुरक्षित अंतर नियमाचे पालन, प्रवेशद्वारावर हातांचे निर्जंतुकीकरण आणि आरोग्य तपासणी.
  • रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, बालके आणि गर्भवतींना प्रवेशास मनाई.
  • करोना प्रतिबंधासाठी दररोज ठराविक संख्येतच भाविकांना प्रवेश.

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील प्रवेशासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळं नोंदणीशिवाय नागरिकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानं तयार केलेल्या 'अ‍ॅप'वर पूर्वनोंदणी केल्यावर क्यूआर कोड मिळणार आहे. एका तासात शंभर भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे.

महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात फुले, पूजासाहित्य, प्रसाद, ओटीचे साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंदिरात भाविकांनाही कोणत्याही प्रकारचा प्रसाद देण्यात येणार नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा