Advertisement

बीकेसी कोविड सेंटरमध्ये अवघ्या १६ सेकंदात फुप्फुस तपासणी

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

बीकेसी कोविड सेंटरमध्ये अवघ्या १६ सेकंदात फुप्फुस तपासणी
SHARES

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. तसंच, कोरोनाबाधित व इतर रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी महापालिकेनं उपचार व्यवस्थेतही वाढ केली आहे. अशातच आता बीकेसीच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठीची अनोखी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'सीटी इन ए बॉक्स' देण्यात येत असून, ही सुविधा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मैदानावर सर्वात मोठे कोविड सेंटर स्थापन केले आहे. कोरोना रुग्णांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी सीटी इन ए बॉक्स ही अनोखी सुविधा आहे. देशातील हे पहिलं मेड इन इंडिया सीटी मशीन आहे. ज्यात फुप्फुसाची तपासणी केवळ १६ सेकंदात होऊ शकते.

आणीबाणीच्या काळात पेशंट स्कॅन मोड सुविधा आहे. या संयुक्त सीएसआर प्रयत्नास काही स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केलं आहे. 'आपले प्रयत्न अधिक बळकट होतील. ही सुविधा सामाजिक अंतराची आवश्यकता लक्षात घेऊन सुरक्षित, वेगळ्या वातावरणामध्ये कोरोना रुग्णांना उत्कृष्ट निदान सुविधांची उपलब्धता करण्यास मदत करते', असं नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

सीटी इन अ बॉक्स 

  • सीटी इन ए बॉक्स ही अभिनव सुविधा आहे.
  • यामध्ये कोरोनासारख्या साथरोगांमध्ये आवश्यक वेगळ्या सीटी स्कॅनची आवश्यकता पूर्ण होते.
  • सीटी डायग्नोस्टिक सोल्युशन प्रदान केले जाते.
  • याचे दोन भाग आहेत.
  • पहिला म्हणजे कोरोना संशयित रुग्णांचे निदान आणि उपचार करण्यासाठी सीटी मशीन
  • दुसरा म्हणजे एक इन्सुलेटेड बॉक्स त्यात आहे.  
  • हा बॉक्स सुरक्षाविषयक सुविधा आणि मदतीसह विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेला आहे. 
  • दुय्यम संसर्ग होत नाही आणि शारीरिक संपर्क होणार आहे.
  • आणीबाणीच्या काळात पेशंट स्कॅन मोड सुविधा आहे. 
  • या संयुक्त सीएसआर प्रयत्नास काही स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले आहे. 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा