Advertisement

आक्रमक ट्रीटमेंटमुळे दुष्‍परिणाम होऊ शकतात, कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सल्ला

रेमिडेसिव्‍हीर तसंच इतर औषधांच्‍या वापराबाबत डॉक्‍टरांनाच ठरवू द्या, उद्धव ठाकरे यांचं रुग्णांच्या नातेवाईकांना आवाहन

आक्रमक ट्रीटमेंटमुळे दुष्‍परिणाम होऊ शकतात, कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सल्ला
SHARES

कोरोनावरील लस उपलब्‍ध होईल तेव्‍हा होईल, तथापी, आज आपण उपचार पद्धती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. अनेकदा रुग्णाचे नातेवाईक उपचाराबाबत आग्रही असतात. परंतु आक्रमक ट्रीटमेंटमुळे दुष्‍परिणाम होऊ शकतात, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. (maharashtra cm uddhav thackeray talks on covid 19 patient treatment)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महसूल विभागातील ५ जिल्‍ह्यांशी दृकश्राव्‍यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढं म्हणाले की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम केलं पाहिजे. कोरोनाचा मुकाबला करण्‍यासाठी आपल्‍याला एका मार्गाने जावं लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्‍वी होण्‍यासाठी त्‍यामध्‍ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. 

हेही वाचा- ठाणे जिल्ह्यात २५ दिवसांत ४० हजार नवीन कोरोना रुग्ण

कोरोनावरील लस उपलब्‍ध होईल तेव्‍हा होईल, तथापी, आज आपण उपचार पद्धती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्‍क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्‍ट अंतर पाळणे यावर आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. समाजामध्‍ये दोन प्रकारचे लोक दिसत आहेत. मनात प्रचंड भीती असलेले आणि दुसरे बेपर्वाईने वागणारे की जे मास्‍क वापरत नाहीत. सोशल-फिजिकल  डिस्टन्स पाळत नाहीत. यातील पॉझिटिव्‍ह लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याचा धोका असतो. त्‍यांच्‍या माध्‍यमातून होणारा संसर्ग कोणासाठी तरी घातक ठरु शकतो, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

गणेशोत्‍सव आपण सर्वांनी साधेपणाने साजरा केला. तरीही या काळात बाजारात जी गर्दी झाली, त्‍यामुळे कोरोनाचा प्रसार झाला का, हेही पाहिलं पाहिजे, आगामी नवरात्र महोत्‍सव साधेपणाने साजरा करावा. रेमडेसिव्‍हीर तसंच इतर औषधांच्‍या वापराबाबत डॉक्‍टरांनाच ठरवू द्या. अनेकदा रुग्णाचे नातेवाईक उपचाराबाबत आग्रही असतात. आक्रमक ट्रीटमेंटमुळे दुष्‍परिणाम होऊ शकतात, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं. 

उपमुख्‍यमंत्री अजित पवार म्हणाले, यापुढील काळात कोरोनामुळे बरे झालेल्‍या रुग्णांना काही त्रास होत नाही ना, याची माहिती घेऊन पोस्‍ट कोविड सेंटर सुरु करावं लागण्‍याची शक्‍यता आहे. काहींना कोरोनाची लक्षणे नसली तरी त्रास होत आहे. त्‍यामुळे मोहिमेच्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यात पोस्‍ट कोविड सेंटरबाबत निर्णय घेता येईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय