Advertisement

दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या अधिक

राज्यात रविवार १५ नोव्हेंबर २०२० रोजी २ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित (coronaviru) आढळले असून याउलट ३०६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या अधिक
SHARES

राज्यात रविवार १५ नोव्हेंबर २०२० रोजी २ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित (coronaviru) आढळले असून याउलट ३०६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवाळीच्या दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज भर पडत असली तरी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्याचसोबत ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. 

नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आता महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ लाख ४७ हजार २४२ लाखांवर गेली आहे. तर आतापर्यंत राज्यभरातील एकूण १६ लाख १५ हजार ३७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४५ टक्के इतका आहे. सोबतच राज्यात कोरोनाच्या ८४ हजार ९१८ अॅक्टिव्ह केसेस असून ४५ हजार ९७४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील न राहता शिस्तीचं पालन आवश्यक आहे. त्यामुळे दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं.

त्यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नसेल तर शिस्तीचं पालन आवश्यक आहे. मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचं पालन करणं या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणू दुप्पट वेगाने वाढत असल्याने काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा