Advertisement

रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला लागणार ब्रेक, ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठेबाजीआला आळा घालतानाच या इंजेक्शनचा राज्यात सर्व ठिकाणी सुरळीत पुरवठा व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला लागणार ब्रेक, ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
SHARES

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने कोरोना रुग्णांवरील उपचारात महत्त्वाचं ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) तुटवडा जावणू लागला आहे. काही ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असल्याचंही उघडकीस आलं होतं. साठेबाजीआला आळा घालतानाच या इंजेक्शनचा राज्यात सर्व ठिकाणी सुरळीत पुरवठा व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयानुसार निविदा पद्धतीने रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने निविदा काढून रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांकडून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि थेट शासकीय रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा करेल. जिल्ह्याजिल्ह्यात इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असेल, त्यालाच या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. 

हेही वाचा- महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळणार नसतील तर.., मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपावर पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असेल. खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येईल. यामुळे खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल आणि इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार  रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तुटवडा भासणार नाही, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

देशात काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांची (coronavirus) संख्या मोठ्या प्रमणात कमी झाल्याने संबंधित कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन कमी केलं होतं. परंतु मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवू लागला. त्यातच काळाबाजार करणाऱ्यांना रेमडेसिवीरचा साठा करून ठेवत कृत्रिम तुटवडा निर्माण केला आणि काळ्या बाजारात चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री केली होती. या साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

(maharashtra government action plan for purchase remdesivir injection)


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा