Advertisement

सरकार ‘ही’ औषधं मोफत वाटण्याच्या विचारांत- उद्धव ठाकरे

कोरोनाची काही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करुन देण्याच्या विचार सध्या प्रशासन करत आहे.

सरकार ‘ही’ औषधं मोफत वाटण्याच्या विचारांत- उद्धव ठाकरे
SHARES

कोणत्याही औषधांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार पाठीमागे नाही. तुम्ही नाव सांगा ती औषधं आपण वापरत आहोत. कोरोनाची काही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करुन देण्याच्या विचार सध्या प्रशासन करत आहे. पण, त्यासाठी केंद्राची परवानगी आणि औषधांची उपलब्धताही आवश्यक (maharashtra government will distribute free medicine on coronavirus says cm uddhav thackeray ) ठरेल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रविवार २८ जून रोजी जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,५९,१३३ वर जाऊन पोहोचला असून ७२७३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८४,२४५ काेरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारे प्रयत्न करत आहेत. धारावी आणि वरळीतील कोरोना हाॅटस्पाॅटला नियंत्रणात ठेवल्यानंतर आता प्रशासनाने आपलं लक्ष उत्तर मुंबईकडे वळवलं आहे. उत्तर मुंबईत धारावी पॅटर्नच्या धर्तीवर घरोघरी स्क्रिनिंग, मोबाईल क्लिनिक, स्ट्रिक कंटेनमेंट आणि प्रभावीपणे क्वारंटाइन मोहीम राबवली जात आहे. `मिशन झिरो’अंतर्गत दहिसर, बोरिवली, कांदिवलीत तीन दिवसांत १६ आरोग्य शिबिरे घेतली आहेत. तर १५ मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून  १ हजार ९५ जणांचे स्क्रिनिंग केलं आहे. मध्यंतरी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्याही वाटण्यात आल्या होत्या. तर आता काही औषधं रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. 

 हेही वाचा - ३० जूननंतर लाॅकडाऊन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

यासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिलेली सगळी औषध आपण वापरत आहोत. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आपण कुठेही कमी पडत नाही आहोत. मार्च, एप्रिलपासून आपण रेमडेसिवीर, फॅवीपीरावीर या औषधांसाठी पाठपुरावा करत होतो. त्याची परवानगी मिळाली. आता रेमडेमीसीवर, फॅवीपीरावीर, टॅझीलोझुमा, एचसीक्यू, डॉक्सी ही कोरोनावर उपयुक्त ठरणारी काही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करुन देण्याचा आपण विचार करत आहोत. परंतु त्यासाठी आधी आपल्या केंद्र सरकारची परवानगी लागेल. त्याचबरोबर ही औषधे देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असली पाहिजेत. रेमडेसीवीरसारख्या औषधांची राज्य सरकार कमतरता भासू देणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

लाॅकडाऊनबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी येत्या ३० जून रोजी लॉकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे पुढं काय? लॉकडाऊन उठेल की नाही, याची जनतेला उत्सुकता लागलेली आहे. पण संकट टळलेलं नाही. धोका टळलेला नाही. त्यामुळे स्पष्टच सांगायचं झालं तर ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, असं सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा