Advertisement

चिंताजनक! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशातील अशा दहा जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जिल्हे आहेत.

चिंताजनक! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
SHARES

देशात कोरोनाने पुन्हा एकदा भयावह रुप धारण केलं आहे. त्यातच महाराष्ट्रासाठी मोठी चिंताजनक बाब समोर आली आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टव्हि रुग्ण असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशातील अशा दहा जिल्ह्यांची यादी  केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जिल्हे आहेत. दहापैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे. तर कर्नाटकातील फक्त बंगळुरूचा जिल्ह्याचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे, असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं.

याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत, अशी माहिती भूषण यांनी दिली.



हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा