Advertisement

महाराष्ट्रात कोरोना वाढीचा वेग कमी!

दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला असता कोरोना विषाणूचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यूदर कमी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

महाराष्ट्रात कोरोना वाढीचा वेग कमी!
SHARES

दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला असता कोरोना विषाणूचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात (maharashtra) कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यूदर कमी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यानभारतबायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा साठा आल्यावर लसीकरण केंद्रांमध्येही वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.

२ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पौंडेचरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगडमध्ये १९ हजार ८७७ इतके पॉझिटिव्ह  रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार ८ रुग्ण होते. महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात ६ वा होता.

महाराष्ट्राने कोविडचा (covid19) मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि  पारदर्शकपणे पावले उचलली. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन केलं. सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचं आणि प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील केलं आहे. इतर काही राज्यांनी तर कोरोनाने मृत्यू झालेल्या पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे कोरोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते इतकंच नाही, तर केवळ कोरोना आहे, पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे कोरोनाचे मृत्यू गृहित धरले नव्हते.

हेही वाचा- शालेय शुल्काबाबत हस्तक्षेप नाही, सरकारची हायकोर्टात भूमिका

एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार  दिल्लीत ६४७, गोव्यामध्ये ५२७, पौंडेचरीत ५२२, आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.

कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या दराचा विचार केला तर ३ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढता दर होता ०.१०% तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहापट जास्त म्हणजे ०.६१%, गोवा ०.२%, पंजाब ०.१२%, गुजरात आणि छत्तीसगड ०.११% असा दर होता.

सक्रिय रुग्णाबाबत महाराष्ट्रात (maharashtra) दर दशलक्ष लोकसंख्येत २९०, रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आज आहेत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा