Advertisement

राज्यात रविवारी ८२९३ नवे कोरोना रुग्ण

मुंबईत रविवारी १ हजार ०५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात रविवारी ८२९३ नवे कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात रविवारी कोरोनाचे नवीन ८२९३ रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ५५ हजार ७० वर पोहोचली आहे. रविवारी ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ३७५३ जण बरे झाले. राज्यात आजपर्यंत ५२ हजार १५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० लाख २४ हजार ७०४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८ आहे.

मुंबईत रविवारी १ हजार ०५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ८२७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.  मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ लाख २५ हजार ९१५ वर झाली आहे. त्यापैकी ३ लाख ३ हजार ८६० जण बरे झाले असून ११ हजार ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ९ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ७० नमूने (१३.२३ टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ जण गृहविलगीकरणात असून, ३ हजार ३३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा