Advertisement

राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ८७०२ रुग्ण

राज्यात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २५२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ८७०२ रुग्ण
SHARES

राज्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी ८ हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

बुधवारी राज्यात बुधवारी ८८०७ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी ८७०२ नवीन रुग्ण आढळले. तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४४ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९ टक्के आहे. राज्यात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २५२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ६४ हजार २६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गुरुवारी ३७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख १२ हजार ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात गुरूवारी १६ हजार ५७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १,१०,६३,४९१ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा १,५६,८२५ इतका झाला आहे. गुरुवारी १२,१७९ जण बरे झाले आहेत.  देशात आतापर्यंत १,०७,५०,६८० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या १,५५,९८६ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा