HIV ग्रस्तांचे ऋणानुबंध 'मैत्र' अॅपवर जुळवणार

 Pali Hill
HIV ग्रस्तांचे ऋणानुबंध 'मैत्र' अॅपवर जुळवणार

मुंबई - एड्सबाधित रुग्णांसाठी मुंबई महापालिकेनं 'मैत्र' नावाचं अनोखं मोबाईल अॅप तयार केलंय. या अॅपद्वारे उपचार केंद्र, औषधोपचार आणि आजाराबाबत सल्ले दिले जाणारायेत. तसंच एड्सबाधित रुग्णांचे ऋणानुंबध जुळवण्यासाठी हे अॅप फायदेशीर ठरेल, असा विश्वास महापालिकेनं व्यक्त केलाय.

एड्सबाधितांना घरबसल्या आजाराची माहिती मिळवी, याउद्देशानं मुंबई महापालिकेनं मोबाईल अॅप तयार केलं आहे. 'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन' आणि 'युवर टेक्नॉलॉजी' या सामाजिक संस्थांनी एड्सबाधितांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेवून हे अॅप तयार केलंय. हे अॅप विनामूल्य असून ते प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलंय.

1 डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून या मोबाईल अॅपचे लोकार्पण महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते केईएम रुग्णालयात करण्यात येणाराय.

Loading Comments