Advertisement

डासांमुळे वाढतोय आजारांचा प्रादुर्भाव

शहरात डासजन्य आजारांचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे.

डासांमुळे वाढतोय आजारांचा प्रादुर्भाव
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मलेरियाचे ७२, डेंग्यूचे ४७ तर ६ चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात डासजन्य आजारांचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे.

२०२१ मध्ये, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०२० साली १२९ रुग्ण आढळले होते. तर यावर्षी ७७७ रुग्ण आहेत. याव्यतिरिक्त, आतापर्यंत ३ लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही यंदा वाढ झाली आहे. यावर्षी एकूण ५४ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. गेल्या दोन वर्षांत चिकनगुनियाचे एकही प्रकरण महापालिकेकडे आलेलं नव्हतं. H1N1 इन्फ्लूएंझा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किंचित वाढला आहे. गेल्या वर्षी ४४ रुग्ण दाखल झाले होते, या वर्षी त्यांची संख्या ६४ आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांचा हवाला दिला आहे. त्यांनी लोकांना सावध केलं की त्यांनी स्वत: ची औषधोपचार करणं टाळावं आणि डॉक्टरांना भेटावं.

त्याचप्रमाणे, प्रशासकिय प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, कोरोनाव्हायरसमुळे लागलेल्या  लॉकडाऊनमुळे पावसाळ्यातील बहुतेक आजारांचे प्रमाण खूपच कमी होते.हेही वाचा

औषधांच्या किंमती ४० टक्क्यांनी महागल्या

कोरोना काळात ८० लाख प्लॅस्टिक कचरा निर्माण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा