Advertisement

औषधांच्या किंमती ४० टक्क्यांनी महागल्या

इंधन दरवाढीनंतर आणखी एक फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.

औषधांच्या किंमती ४० टक्क्यांनी महागल्या
SHARES

ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झालीय. यासोबतच प्रतिजैविक औषधं तसंच टॉनिक आणि खोकल्याच्या औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीनंतर आणखी एक फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक पुरवठा साखळीत अडथळा आला आहे. त्यामुळे भारतात पॅरासिटामॉलसह पेनकिलर, अँटीइन्फेक्टीव्ह, कार्डियाक आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्यात.

औषधी क्षेत्रात ज्याला सक्रिय फार्मास्युटिकल घटक किंवा API म्हणतात त्याच्या किंमतीत वाढ झाल्याने औषधे महागली आहेत.

कोरोनामुळे औषध निर्मितीसाठी अत्यावश्यक असलेल्या कच्चा मालाची पुरवठा साखळी अडचणीत आली. अत्यावश्यक औषधांच्या कच्च्या मालाच्या किंमतीत सरासरी ५० टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. काही घटकांची वाढ १४० टक्क्यांपर्यंत पर्यंत गेली आहे.

औषधं निर्मितीसाठी लागणाऱ्या सक्रिय फार्मास्युटिकल घटक किंवा API ची भारत जवळपास ७० टक्के कच्चा माल चीनमधून आयात करतो. आपला देश लोकसंख्येमुळे मधुमेह आणि रक्तदाबाची जागतिक राजधानी झाला आहे. त्यामुळे या औषधांचीा मागणी जास्त आहे.

रक्तदाबाची गोळी पूर्वी दहा गोळ्यांची एक स्ट्र्पीची किंमत १७२ रूपये होती. ती आता १९० झाली आहे. मधुमेहाची एक स्ट्रीप ११ रुपये ३० पैशाला होती. ती आता १८ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे.

अँटासिडच्या १५ गोळ्यांची किंमत पूर्वी २४ रुपये होती ती आता ३७ रुपये झाली आहे. झंडूबाम ३५ रुपये होता, तो ४० रुपयांना मिळणार आहे. विक्स इनहेलर आधी ५० रुपयांचं होतं, ते आता ५९ रुपयांना मिळणार आहे.

खोकल्याच्या एका बॅाटलची किंमत सहा महिन्यात ४० ते ५० रूपयांनी वाढली आहे. डेटॅालची १०५ रुपयांची बॅाटल आता ११६ रुपये झाली आहे. कॅल्शियम गोळ्यांच्या किंमती ९९ रुपयांवरुन ११० रुपयांवर गेल्या आहेत. त्वचा रोगावर चालणारे औषध ३७ रुपयांसाठी होते, ते आता ४६ रुपयांना मिळणार आहे.हेही वाचा

दिवाळीनंतर लसीकरणाची गाडी सुसाट!

सुईविनाच होणार लहान मुलांचं लसीकरण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा