Advertisement

दिवाळीनंतर लसीकरणाची गाडी सुसाट!

सोमवारपर्यंत, CoWin अॅपनुसार, मुंबईतील ६२% लोकसंख्येचं संपूर्ण लसीकरण झालं आहे.

दिवाळीनंतर लसीकरणाची गाडी सुसाट!
SHARES

दिवाळीच्या सणात लसीकरणाचा वेग कमी झाला होता. तथापि, सोमवार, ८ नोव्हेंबर रोजी, लसीकरणानं ५ लाखाचा टप्पा गाठला आहे. यात मुंबईतील एक लाख लसीकरणाचा समावेश आहे.

९ नोव्हेंबर, महाराष्ट्रात १० कोटी कोविड-19 लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. CoWin अॅपनुसार सोमवारी राज्यात एकूण ४ लाख ८९ हजार ४७९ डोसची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण १ लाख ०७ हजार १५५  डोस देण्यात आले आहेत.

या एक लाख डोसपैकी ८५ हजार ९३३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर २१ हजार २२२ जणांना पहिला डोस देण्यात आला.

शहरानं त्याच्या ९९% प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस दिला आहे. सोमवारपर्यंत, CoWin अॅपनुसार, मुंबईतील ६२% लोकसंख्येचं संपूर्ण लसीकरण झालं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितलं की, ते दुसऱ्या डोसच्या लसीकरणावर भर देत आहेत. जर बरेच लोक त्यांच्या दुसर्‍या डोसची वाट पाहत असतील तर अशांसाठी त्या भागात कॅम्पस ठेवण्याची त्यांची योजना आहे.

प्रशासनानं म्हटलं आहे की, दुसऱ्या डोस प्राप्तकर्त्यांच्या यादीतून ज्यांची नावे गायब आहेत त्यांच्या तीन श्रेणी असू शकतात. पहिली श्रेणी मुंबईबाहेर लस टोचलेल्या लोकांची असेल. दुसरा गट अशा लोकांचा असेल ज्यांना दोन्ही डोस देऊन लसीकरण केलं गेलं आहे. परंतु त्रुटीमुळे नाव यादीत आलं नाही, तर तिसरी श्रेणी ज्यांना अद्याप लसीकरण मिळालेलं नाही.

दरम्यान, सोमवारी, ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी १००० पेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.



हेही वाचा

सुईविनाच होणार लहान मुलांचं लसीकरण

नवी मुंबई पालिकेची फवारणी करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा