Advertisement

मुंबईत पहिल्या दिवशी १२५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण


मुंबईत पहिल्या दिवशी १२५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण
SHARES

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात १३ ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईतील ९ केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे.

या लसीकरणासाठी परेलच्या पालिका कार्यालयातून कोरोना लस केंद्रावर पाठवण्यात आली आहे. तसेच लस वाहतूक करणाऱ्या लसीच्या गाडीला विशेष सुरक्षा पुरवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनी दिली.

'मुंबईत शनिवारी ९ ठिकाणी कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी मी उद्या स्वत: वांद्रे कुर्ला संकुल मध्ये जाणार आहे. यासाठी ज्या लोकांनी नोंदणी केली आहे. त्यांना ३ ठिकाणी ओळखपत्र दिले जाईल. त्यानंतर लसीकरण करण्यात येईल,” अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.

'ज्या लोकांना कोरोना लस घ्यायची आहे, त्यांचे सर्वात आधी काउसिलिंग केलं जाईल. कोरोना लस घेतल्यानंतर जर कोणाला त्रास झाला, तर त्याला तात्काळ अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात येईल. यासाठी सर्व सोय करण्यात आली आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानतंर ती ३० मिनिटात घरी जाईल. तसेच पुढील ४८ तासात त्याला त्रास झाल्यास कर्मचारी माहिती घेतील', असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

पहिल्या दिवशी मुंबईतील ९ केंद्रांमध्ये १२ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले आहे, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक, नायर, केईएम, कूपर, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरच्या राजावाडी, सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र असेल. तर बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रामध्ये ७२ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकूण ४ टप्प्यांमध्ये लसीकरण केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख २५ हजार वैद्यकीय कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील नागरिक आणि गंभीर आजर असलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. तर अखेरच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.

मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केलं जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा