Advertisement

राजावाडी रुग्णालयातील रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडला, महापौर म्हणाल्या....

या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

राजावाडी रुग्णालयातील रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडला, महापौर म्हणाल्या....
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या सर्व गोष्टीची खातरजमा करत होतो तेव्हा लक्षात आलं की, हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पण तळाला असल्यानं आणि पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा. रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्यानं निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्यानं लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली.

महापौरांनी पुढे म्हटलं, आयसीयू वॉर्ड असल्यानं तळ मजल्यावरच असायला हवा कारण रुग्णाला नेण्यासाठी बरं पडतं. इतकी खबरदारी घेतली असतानाही उंदीर आतमध्ये जातात. ही संपूर्ण घटना गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्यानं दाखल केलं होतं. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचं समोर आलं आहे. यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसलं. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदरानं कुरतडल्यासारखं दिसून आलं. रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.



हेही वाचा

वरळी-कोळीवाडा कोरोनामुक्तीकडे, १४ दिवसात एकही रुग्ण नाही

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा