देवनारमध्ये मधुमेहावर मोफत मार्गदर्शन शिबीर

 Mumbai
देवनारमध्ये मधुमेहावर मोफत मार्गदर्शन शिबीर

देवनार - मधुमेहाचा आजार असलेल्यांसाठी देवनारमध्ये मोफत मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. एम. बी. बरवालिया फाउंडेशनतर्फे राबवल्या जाणाऱ्या या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणीही केली जाणार आहे. याशिवाय याठिकाणी रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी आणि नेत्र तपासणी देखील मोफत केली जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे चेअरमन डॉ. प्रफुल्ल बरवालिया आणि डॉ. राहुल जैन यांनी दिली आहे. देवनारमधील स्पंदन होलिस्टिल या रुग्णालयात शुक्रवारी 13 जानेवारीला हे शिबीर राबवले जाणार आहे. दरम्यान सिनेकलाकार संजय कसबेकरदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments