वरळीत ब्रेस्ट कँसर तपासणी शिबिराचं आयोजन

 BDD Chawl
वरळीत ब्रेस्ट कँसर तपासणी शिबिराचं आयोजन
वरळीत ब्रेस्ट कँसर तपासणी शिबिराचं आयोजन
वरळीत ब्रेस्ट कँसर तपासणी शिबिराचं आयोजन
See all

वरळी - मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन वरळीच्या जांबोरी मैदानात शनिवारी करण्यात आलं. समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिरात 165 महिला सहभागी झाल्या होत्या .

या वेळी संस्थेचे अध्यक्ष संजय नारींग्रेकर, सचिव सूर्यकांत कलबाटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे माजी महापौर नंदू साटम यांची उपस्थिती होती.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे महिलांमध्ये आढळल्यास त्यांचे उपचार देखील टाटा रुग्णालयात करणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष नारींग्रेकर यांनी सांगितलं.

समर्थ प्रतिष्ठानची स्थापना 2011 मध्ये झाली होती. तेव्हापासून ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्यांनी आतापर्यंत विविध विभागात अनेक तपासणी शिबीर राबवले आहेत. तसंच ग्रामीण आणि आदिवासी पाड्यात देखील या संस्थेने मेडिकल कॅम्प, शैक्षणिक मदत केली आहे.

Loading Comments