Advertisement

आॅक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

आॅक्सिजन उत्पादक कंपन्या, पुरवठादाराकडून रुग्णालयांपर्यंत आॅक्सिजन वेळेत पोहोचावा, यासाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना राज्य सरकारकडून रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे.

आॅक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा
SHARES

कोरोना संकटाच्या काळात सध्या राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनची मागणी वाढली आहे. रुग्णांना वेळेत आॅक्सिजनचा पुरवठा व्हावा. तसंच आॅक्सिजन उत्पादक कंपन्या, पुरवठादाराकडून रुग्णालयांपर्यंत आॅक्सिजन वेळेत पोहोचावा, यासाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना राज्य सरकारकडून रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. (medical oxygen supplier vehicle gets ambulance status in maharashtra)

याबाबतची अधिसूचना गृह विभागाने नुकतीच जारी केली आहे. त्यानुसार वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन लावता येईल तसंच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही. या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते.  

कोविड-१९ रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा.५३) चे कलम ३८ चे उप कलम (१) आणि उपकलम (२) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम- १९८७१८९७ चा ३) चे कलम २ अन्वये यासाठी या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनाविरुद्ध ‘हाच’ महत्त्वाचा मंत्र- उद्धव ठाकरे

त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिका समकक्ष वाहन तसंच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे. अशा वाहनांना केंद्रिय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १०८ च्या उप नियम (७) तसंच नियम ११९ च्या उप नियम (३) च्या तरतूदी लागू करण्यात येत आहे, असं गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

सध्या राज्यात १००० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होतं. मात्र गरज ५०० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसं असलं तरी पुढील काळात आॅक्सिजनची आणखी गरज पडू शकते, असं डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावं. ऑक्सिजनचा नेमका किती उपयोग केला जातोय त्याचं दररोज ऑडिट करावं व अपव्यय टाळावा, असंही ते म्हणाले.

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सची वाहतूक रोखू नये तसंच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी दिली आहे.

हेही वाचा - ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रुमची स्थापना – आरोग्यमंत्री राजेश टोपे


संबंधित विषय
Advertisement