Advertisement

आमचे हात जोडलेलेच राहू द्या, वाडियाप्रकरणी शर्मिला ठाकरेंचा सरकारला इशारा

सध्या हात जोडून विनंती करतोय, तरी आमचे हात जोडलेलेच राहू द्या.

आमचे हात जोडलेलेच राहू द्या, वाडियाप्रकरणी शर्मिला ठाकरेंचा सरकारला इशारा
SHARES

मुंबईतील परळ येथील वाडिया रुग्णालय प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे पून्हा रस्त्यावर उतरली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला मनसेकडून तीव्र विरोध दर्शवला असून सध्या हात जोडून विनंती करतोय, तरी आमचे हात जोडलेलेच राहू द्या. अशा इशारा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रशासनाला दिला.

निधीअभावी वाडिया रुग्णालयात रुग्णांच अॅडमिशन घेणं बंद करण्यात आलं आहे. राज्य आणि मुंबई महापालिकेकडून अनुदान थकित असल्याचं कारण देत वाडिया रुग्णालय प्रशासनानं बाई जेरबाई वाडिया आणि नौरोजी वाडिया ही दोन्ही रुग्णालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश कालिन या रुग्णालयात सर्व सामान्य मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. काही दिवसांपूर्वी एक महिला राज यांच्या बंगल्याबाहेर आली होती. त्यावेळी तिने तिची व्यथा शर्मिला ठाकरे यांच्याजवळ मांडली. त्यानंतर मनसेकडून वाडिया रुग्णालय बंद होण्यामागील कारणांचा आढावा घेतला. त्यावेळी३०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. शस्त्रक्रियांपासून बाह्यरुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली आहे.

प्रशासनाला इशारा

या विरोधात सोमवारी मनसे वाडिया रुग्णालयाबाहेर जमा होत प्रशासना धारेवर धरले.  त्यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ‘हे ब्रिटिश कालिन रुग्णालय असून मुंबईसह राज्यभरातून नागरिक या रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे हे रूग्णालय सुरू राहण्यासाठी योग्य ती पाऊले प्रशासनाने उचलायला हवीत, ‘कुठल्याही परिस्थिती वाडिया रुग्णालय बंद होऊ देणार नाही, सध्या हात जोडून विनंती करतोय, तरी आम्हचे हात जोडलेलेच राहू द्या. अशा इशारा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रशासनाला दिला.

काय आहे प्रकरण?

बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाचे ३० कोटी आणि नौरोजी वाडिया रुग्णालयाचे १०५ कोटी असे सुमारे १३५ कोटी रुपये पालिकेकडे थकित आहेत. इतके अनुदान थकित असतानाही रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासन रुग्णालय चालवित होतं. मात्र, आता प्रशासनाला हे रुग्णालय चालविणं शक्य नाही. रुग्णालयाकडे आता २ दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा उपलब्ध आहे. पुढील उपचार करणं शक्य नसल्यानं रुग्णांचा जीव धोक्यात टाकू नये यासाठी रुग्णांना रुग्णालय सोडून अन्य ठिकाणी पाठविण्यात येत आहे. आत्तापर्यत जवळपास ३०० रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. बोनमॅरो ट्रान्सप्लांट, हृदयरोग, मूत्रपिंड इत्यादी सर्व शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. सोमवारपासून बाह्यरुग्ण विभागही बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचाः- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा