Advertisement

घराजवळ हवं कोरोना लसीकरण केंद्र, मनसेची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून घराजवळ लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून केली आहे.

घराजवळ हवं कोरोना लसीकरण केंद्र, मनसेची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लस देणाऱ्या केंद्रांची संख्या अपुरी असल्याने लसीकरणासाठी जाणाऱ्या जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून घराजवळ लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांना पत्र लिहून केली आहे.

नितीन सरदेसाई यांनी आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड (coronavirus) प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात झाली आहे. नोंदणीसाठी असलेल्या ‘कोविन पोर्टल’मध्ये पहिल्याच दिवशी झालेल्या गडबडीमुळे लसीकरण सुरू व्हायला उशीर झाला. त्यामुळे अनेक वरिष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. केंद्रावरच नोंदणी सुरू झाल्याने तसंच केंद्रांची संख्यासुद्धा कमी असल्याने उपलब्ध केंद्रांवर वरिष्ठ नागरिकांची गर्दी वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होऊनसुद्धा केवळ गर्दीमुळे त्यांचं लसीकरण होऊ शकलं नाही.

हेही वाचा- मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार कोरोनाची लस, 'ही' आहे यादी

मुंबईसारख्या (mumbai) महानगरात केवळ ५ ठिकाणी सरकारी आणि ३ ठिकाणी खासगी केंद्रांवर लस दिली जात असल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण मुंबईसाठी केवळ ८ केंद्र ही संख्या अतिशय कमी आहे. ज्येष्ठ नागरिकांचं वय व त्यापैकी अनेकांची तब्येत लक्षात घेता त्यांना घरापासून दूर असलेल्या ठिकाणी पोहोचणं तसंच रांगेत ताटकळत राहणं अशक्य आहे. म्हणून त्यांच्या घराजवळ लसीकरण केंद्र उपलब्ध होणं गरजेचं आहे.

ज्येष्ठांसाठी लसीकरण सोयीचं करण्यासाठी मुंबईत तसंच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने लसीकरण केंद्र उपलब्ध होणं गरजेचं आहे. नागरिकांसाठी महापालिकेचे दवाखाने, सरकारी इस्पितळे, आराेग्य केंद्र त्याचबरोबर मोठी गृहसंकुले, समाज कल्याण केंद्र अशा इतर ठिकाणीसुद्धा लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची व्यवस्थासुद्धा करायला हवी, अशी मागणी नितीन सरदेसाई यांनी केली आहे. 

(mns leader nitin sardesai demands to increase covid 19 vaccination centers in mumbai and maharashtra)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा