Advertisement

मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार कोरोनाची लस, 'ही' आहे यादी

सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारपासून २९ खासगी रुग्णालयांची नावे कोविन पोर्टलवर उपलब्ध असतील.

मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार कोरोनाची लस, 'ही' आहे यादी
SHARES

देशात कोरोना लसीकरण्याचा दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस दिली जाणार आहे. मुंबई महापालिकेने या रुग्णालयांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.

सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारपासून २९ खासगी रुग्णालयांची नावे कोविन पोर्टलवर उपलब्ध असतील. लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार संबंधित रुग्णालयाची निवड करुन कोविन पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि लस घेऊ शकतात.  

या रुग्णालयांमध्ये होणार लसीकरण

१) सुश्रूषा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विक्रोळी

२) के. जे. सोमैय्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर

३) डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल

४) वोक्हार्ट हॉस्पिटल

५) सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल

६) सैफी हॉस्पिटल

७) पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल

८) डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल

९) कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट

१०) मसीना हॉस्पिटल

११) होली फॅमिली हॉस्पिटल

१२) एस. एल. रहेजा हॉस्पिटल

१३) लिलावती हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र

१४) गुरु नानक हॉस्पिटल

१५) बॉम्बे हॉस्पिटल

१६) ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल

१७) फोर्टिस हॉस्पिटल

१८) भाटिया जनरल हॉस्पिटल

१९) ग्लोबल हॉस्पिटल

२०) सर्वोदय हॉस्पिटल

२१) जसलोक हॉस्पिटल

२२) करुणा हॉस्पिटल

२३) एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल

२४) एआरसीसी चिल्डर्न हॉस्पिटल

२५) कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल

२६) कॉनवेस्ट अॅण्ड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल

२७) सुराणा सेठीया हॉस्पिटल

२८) होली स्पिरिट हॉस्पिटल

२९) टाटा हॉस्पिटल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा