फिरतं आरोग्य तपासणी वाहन

 BMC office building
फिरतं आरोग्य तपासणी वाहन
फिरतं आरोग्य तपासणी वाहन
फिरतं आरोग्य तपासणी वाहन
See all

परळ - रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवली आणि युनिकेअर हेल्थ सेंटर यांच्या वतीनं मोफत फिरतं आरोग्य चिकित्सा वाहन नागरिकांच्या आरोग्यासाठी उभं करण्यात आलंय. यात नाडी परीक्षण, आहाराबाबत मार्गदर्शन, मधुमेह तपासणी, रक्तदाब, प्रकृती परीक्षण, बी.एम. आय. आणि बॉडी फॅट या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या. 250 हुन अधिक नागरिकांनी यात तपासण्या करून घेतल्या असून रुग्णांना 50 टक्के डिस्काउंट दरात औषध देण्यात आली, अशी माहिती युनिकेअर हेल्थ सेंटर प्रतिनिधी विवेक मंडलिक यांनी दिली. मुंबई, नवी मुंबई आदी भागांमध्ये या फिरत्या वाहनांच्याद्वारे हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे, असंही ते म्हणाले.

Loading Comments