Advertisement

औषध विक्रेते अडचणीत


औषध विक्रेते अडचणीत
SHARES

मुंबई - रुग्णांना वेळेत औषधं मिळावीत यासाठी औषध विक्रेत्यांना (मेडीकल स्टोअर्स) 500 आणि एक हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारणे बंधनकारक केले आहे. मात्र त्याचवेळी किरकोळ औषध विक्रेत्यांकडून 500, 1000 च्या नोटा घाऊक औषध विक्रेते स्वीकारत नसल्यानं किरकोळ औषध विक्रेत्यांची अडचण झाली आहे. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यास रांगाच रांगा असल्याने औषध विक्रेत्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. औषध खरेदीसाठी नव्या नोटा नसल्यानं औषध खरेदीवर त्याचा परिणाम होत आहे. हे असंच आणखी आठवडाभर चालत राहिलं तर औषधटंचाई निर्माण होईल आणि त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होईल असं म्हणत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशननं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच साकडे घातले आहे. असोसिएशननं एक पत्र लिहित घाऊक विक्रेत्यांना जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश द्यावेत अन्यथा किरकोळ विक्रेत्यांना बँकांकडून प्राधान्याने किरकोळ औषध विक्रेत्यांना नव्या नोटा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा