मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराबाबत जनजागृती

 wadala
मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराबाबत जनजागृती
मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराबाबत जनजागृती
See all

शीव - मल्टिपल स्क्लेरोसिस या गंभीर आजाराबाबत जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरु तेग बहादूरनगर ते शीव स्थानकापर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली होती. मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या सचिव सुंदरी राजू यांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीत एसआयइएस कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉ. उमा शंकर, मुख्याध्यापिका डॉ. मंजू फडके यांच्यासह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 50 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

मल्टिपल स्क्लेरोसिस हा मानवी शरीराला पूर्णतः अपंगत्व आणणारा गंभीर आजार आहे. मुंबईत या आजारानं ग्रासलेल्या तरुणांची संख्या लाखावर आहे. मात्र केवळ 500 लोकांनी संस्थेकडे नोंदणी केलीय. मल्टिपल स्क्लेरोसिस हा केंद्रीय मज्जा संस्थेचा आजार आहे. हा आजार शरीराच्या निरनिराळ्या अवयवावर घातक परिणाम करतो. त्यामुळे शरीराला पूर्णतः अपंगत्व येते.

Loading Comments