Advertisement

परदेशात पुर्ण लसीकरण झालेल्या भारतीय जोडप्याला रेल्वे पास देण्यास नकार

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आला आहे.

परदेशात पुर्ण लसीकरण झालेल्या भारतीय जोडप्याला रेल्वे पास देण्यास नकार
SHARES

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आला आहे. लोकल प्रवासासाठी युनिव्हर्सल पास बंधनकारक असून, त्याद्वारे प्रवासांना रेल्वे स्थानकात लोकलचा मासिक पास उपलब्ध होते. या पासच्या सुविधेमुळं लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. असं असलं तरी मुंबईतील एका जोडप्याचं कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झाले असूनही त्यांना लोकल पास देण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बोरिवली परिसरात हे जोडपं राहणारं असून त्यांनी परदेशी म्हणजेच कॅलिफोर्नियामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र त्यांनी घेतलेल्या दोन्ही डोसची नोंदणी कोविन अॅपवर न झाली नव्हती. दरम्यान, परदेशी झालेल्या लसीकरणाची नोंदणी कोविन ऑपमध्ये होत नसल्यामुळं या जोडप्याला पास देण्यास नकार दिल्याचं समजतं.

अँजेला फर्नांडिस (६५) आणि नवरा काजेतन (७१) असं या जोडप्याचं नाव असून, ते फेब्रुवारी २०२० मध्ये आपल्या मुलाला भेटण्यासाठी परदेशी गेले होते. याचवेळी भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळं त्यांना मायदेशी म्हणजेच भारतात येणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी २०२१ मध्ये भारतात येण्याचा निर्णय घेतला. या प्रवासासाठी त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले.

भारतात पोहोचल्यावर सप्टेंबर महिन्यात त्यांनी रेल्वेचा पास काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, कोविन अॅपवर त्यांची लसीकरणाची नोंद झाली नसल्यानं त्यांना पास नाकरण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा