Advertisement

वॉकहार्ट रुग्णालयात COVID 19 रुग्णांवर पुन्हा उपचार, २० रुग्णांवर करणार प्लाझ्मा थेरपी

जगभरात कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपीला डॉक्टरांना चांगलं यश मिळालं आहे. वॉकहार्टनं २० रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी सुरू केल्याची माहिती आहे.

वॉकहार्ट रुग्णालयात COVID 19 रुग्णांवर पुन्हा उपचार, २० रुग्णांवर करणार प्लाझ्मा थेरपी
SHARES

वॉकहार्ट रुग्णालय पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर्स आणि नर्सना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. पण आता हे डॉक्टर्स आणि नर्स कोरोनामुक्त झाले आहेत. डॉक्टर्स आणि नर्सेस कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालय सॅनिटाईज करण्यासाठी बंद करण्यात आलं होतं. पण सोमवारी रुग्णालय पुन्हा सुरू झालं.

वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक जहाबिया खोराकीवाला म्हणाले की, सध्या आम्ही इतर गंभीर आणि आपत्कालीन आजारांवर उपचार देण्यास तयार नाही आहोत. आता फक्त कोरोना रूग्णांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जाईल.

आम्ही अशा रुग्णांसाठी देखील रुग्णालयात जागा केली आहे ज्यांची प्रकृती जास्त गंभीर नाही आणि त्यांना ICU मध्ये ठेवण्याची आवश्यक्ता नाही. अशा रुग्णांसाठी देखील आम्ही वॉर्ड बनवले आहेत. याशिवाय सार्वजनिक रुग्णालयांपेक्षा खाजगी रुग्णालयाला प्राधान्य देणाऱ्यांसाठी देखील आम्ही सोय केली आहे, असं खोराकीवाला यांनी सांगितलं.

ते हे देखील म्हणाले की, वॉकरहार्टनं चिंताजनक प्रकृती असणाऱ्यांसाठी २० बेड्स तयार करण्यात आले आहेत. तर पुढच्या ४८ तासांत आणखी १८ बेड्स जोडल्या जातील. त्यानंतर आवश्यकतेनुसार क्षमता वाढवली जाईल.

जगभरात कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपीला डॉक्टरांना चांगलं यश मिळालं आहे. वॉकहार्टनं २० रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी सुरू केल्याची माहिती आहे. यासाठी वॉकहार्ट रुग्णालयातीलच डॉक्टराचा डोनर म्हणून वापर केला जाईल. नुकतेच हे डॉक्टर कोरोनामुक्त झाले आहेत.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा