छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांचे आरटी-पीसीआर चाचणी अहवाल मिळण्यासाठी ८ तासांऐवजी अवघ्या १३ मिनिटांची प्रतीक्षा करावी लागेल.
सीएसएमआयएनं १५ डिसेंबर रोजी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) मानकांच्या अनुपालन एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर केलं जे विमानतळावर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी उपलब्ध असेल.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एक्झिट गेट बी जवळील लेव्हल २ (आगमन)वर अॅबॉट ‘आयडी नाऊ ™’ ही चाचणी पद्धत स्वीकारणारं पहिलं विमानतळ ठरलं आहे. सीएसएमआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एक्स्प्रेस चाचणी ४ हजार ५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी प्रवाशांना १३ मिनिटांत त्वरित आणि अचूक निदान प्रदान करू शकते.
जर ही चाचणी करायची नसेलतर प्रवासी नियमित आरटी-पीसीआर चाचणी करू शकतात. या चाचणीच्या निकालास सुमारे ६ ते ८ तास लागतात.
दरम्यान, यापूर्वी २९ डिसेंबर रोजी भारतामध्ये COVID १९ च्या नव्या स्ट्रेनचे ६ रुग्ण आढळले. सर्व ६ रुग्ण नुकतेच ब्रिटनहून परत आले. सरकारच्या निवेदनानुसार, बेंगळुरुच्या निमहंसमधील ३, हैदराबादमधील २ आणि पुणे मधील १ असे ६ रुग्ण आहेत.