Advertisement

पुणेकराचं हृदय मुंबईकराला, ८४वं यशस्वी हृदय प्रत्यारोपण


पुणेकराचं हृदय मुंबईकराला, ८४वं यशस्वी हृदय प्रत्यारोपण
SHARES

मुंबईत ८४ व्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुलुंडच्या फोर्टिज हाॅस्पिटलमधील हृदयशल्यविशारद टीमने ४२ वर्षीय व्यक्तीवर हे हृदय प्रत्यारोपण केलं आहे.


चेंबूरमधील व्यक्तीला हृदय मिळालं

पुण्याच्या ३൦ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्यावर त्याच्या पत्नीने त्याचं हृदयदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेंबूरमधील एका व्यक्तीला गुरुवारी हृदय मिळालं.


हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतील हे ८४ वं यशस्वी हृदय प्रत्यारोपण आहे. पुण्यातील ३൦ वर्षांचा तरुण हायपर टेन्शनमुळे घरातच कोसळला. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याला रुबी हाॅल क्लिनिक हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं. काही वेळातच त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या पत्तीने त्याचं हृदय, यकृत, मूत्राशयाचं दान केलं आहे. पुण्याहून पहाटे २.१८ वाजता निघालेले हृदय पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी मुलुुंड फोर्टिज रुग्णालयात पोहोचलं. पुण्या १५४ किमी अंतर कापण्यास १ तास ४९ मिनिटांचा अवधी लागला. त्यानंतर तत्काळ त्यांच्यावर ह्रदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा