Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

बलात्कार पीडितेच्या गर्भपातास परवानगी नाहीच, हायकोर्टानं याचिका फेटाळली


बलात्कार पीडितेच्या गर्भपातास परवानगी नाहीच, हायकोर्टानं याचिका फेटाळली
SHARES

'मेडिकल बोर्डाने दिलेल्या वैद्यकीय अहवालात काहीही असाधारण नाही. त्यामुळे आम्ही आपल्याला मदत करू शकत नाही,' असं नमूद करून हायकोर्टानं एका बलात्कार पीडितेच्या गर्भपाताची मागणी करणारी याचिका फेटाळली. 


वडिलांची याचिका

सोळा वर्षांच्या बलात्कार पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी मुंबईत हायकोर्टात धाव घेतली. आपल्या मुलीला अॅनिमियाचा त्रास होत असल्यानं तिची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे तिला गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. ही पीडित २७ आठवड्यांची गर्भवती आहे.


'मेडिकल बोर्डा'ची स्थापना

हायकोर्टानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केईएम रुग्णालयाला 'मेडिकल बोर्डा'ची स्थापना करून गर्भवतीची तातडीनं वैद्यकीय तपासणी करून अहवाल देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे बोर्डाने शुक्रवारी आपला अहवाल हायकोर्टाला सादर केला.


अहवालात काय?

  • पीडितेचा गर्भ २७ आठवड्यांचा 
  • पेशंटच्या प्रकृतीचा सर्व अंगांनी विचार करत तिला वैद्यकीय व मानसिक आधार देऊन गर्भधारणा सुरू ठेवण्याचा सल्ला देणं योग्य
  • वजनाप्रमाणे बाळ जगण्याची ८० टक्के शक्यता
  • प्रसुतीनंतर कुटुंबाची इच्छा असल्यास योग्य प्रक्रियेअंती बाळ दत्तक देता येईल


काय आहे प्रकरण?

श्यामलालने लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर बळजबरीने बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कापूरबावडी पोलिसांनी श्यामलालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पीडित मुलीला मासिक पाळी येणं बंद झाल्यानंतर तिच्या पालकांनी चौकशी केली असता तिने सर्व घटना सांगितली. त्यानंतर पालकांनी तिला मुंबईतील सायन रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवलं. तपासणीत ‌ती ३ महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड झालं. पण, तिची प्रकृती ठिक नसल्याने ती बाळाला जन्म देण्यासाठी सक्षम नाही म्हणून वडिलांनी गर्भपातासाठी याचिका दाखल केली आहे.

याविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हायकोर्टाला अहवाल सुपूर्द केल्याची माहिती दिली.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा